पिंपरी-चिंचवड, दि. २: भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशवंतनगर चौकाजवळ पार्क केलेली १ लाख ७५ हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची ऑटोरिक्षा अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना ३१ मे २०२५ रोजी रात्री साडेनऊ ते १ जून २०२५ रोजी सकाळी पावणे सात वाजण्याच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी कय्युम हजीलाल मुजावर (वय २८, व्यवसाय- रिक्षाचालक, रा. आण्णासाहेब मगरनगर, डी मार्टमागे, चिंचवड) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांची बजाज कंपनीची ऑटोरिक्षा (MH 14 KY 9178) यशवंतनगर चौकातून पिंपरीकडे जाणाऱ्या टेल्को रोडवर, केएसबी चौकाच्या अलीकडे लॉक करून पार्क केली होती.
दरम्यान, अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने रिक्षा चोरून नेली. १ जून रोजी सकाळी फिर्यादी त्या ठिकाणी गेले असता रिक्षा जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता रिक्षा मिळून आली नाही, त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे रिक्षा आणि चोरट्याचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार नाडे करत आहेत.
---------------------------------------------------------------------------------------------------
#PimpriCrime #BhosariMIDC #AutoRickshawTheft #VehicleTheft #PunePolice
Reviewed by ANN news network
on
६/०२/२०२५ ०४:४७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: