डिजिटल अटकेच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करणारा
पुणे: पुणे सायबर पोलिसांनी डिजिटल अटकेच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची ६ कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पनवेल येथे सापळा रचून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाला ९ नोव्हेंबर २०२४ ते १९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान एका अनोळखी व्हॉट्सॲप क्रमांकावरून फोन आला.
या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सायबर पोलिसांनी आरोपी तुषार हरिश्चंद्र वाजंत्री आणि त्याच्या साथीदाराचा शोध सुरू केला.
अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईत पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त आर्थिक व सायबर श्री. विवेक मासाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर श्री. मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे आणि त्यांच्या पथकाने सहभाग घेतला.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#CyberCrime #PunePolice #DigitalArrest #OnlineFraud #Maharashtra #SeniorCitizen #Fraud #CyberSecurity #Pune
Reviewed by ANN news network
on
६/०१/२०२५ ०५:४४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: