कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषणाने झाली आणि त्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील किस्से, शिक्षणप्रवासातील अनुभव आणि आजच्या यशस्वी वाटचालीची कहाणी एकमेकांशी वाटून घेतली. या प्रसंगी शिक्षक कमलाकर पाटील, रंजना टंकसाळे, वाल्मीक हजारे, सीताराम वाघ, देवेदास सरोदे, जयराम पारधी, गीते सर आणि कर्णे मॅडम यांचा विशेष सन्मान करण्यात आला. गुरुजनांचा आदर करताना अनेक माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
या स्नेहमेळाव्याला शाळेचे माजी शिपाई आणि सध्या पुणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे आयुक्त असलेले सोमनाथ बनकर साहेब, तसेच प्रशालेचे प्रभारी प्राचार्य जीवन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर विचार व्यक्त करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात जुन्या फोटोंचे प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अल्पोपाहाराची सोय करण्यात आली होती, ज्याचा आनंद सर्व उपस्थितांनी लुटला. या स्नेहमेळाव्याचे संपूर्ण आयोजन १९९८-९९ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी केले होते. त्यांनी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आणि पुन्हा अशाच एका स्नेहभेटीचे वचन देत कार्यक्रमाची सांगता केली.
Alumni Meet, School Reunion, Pune Education, Dr Sarvepalli Radhakrishnan Prashala, Boopodi
#AlumniMeet #SchoolReunion #PuneNews #DrRadhakrishnanPrashala #Boopodi #BatchOf1999 #TeachersFelicitation #Memories
Reviewed by ANN news network
on
६/१२/२०२५ ०८:३२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: