लायन्स इंटरनॅशनलतर्फे 'नया सवेरा' महत्त्वाकांक्षी प्रकल्प; दृष्टिहिनांना मिळणार नवसंजीवनी

 


पुणे: वैश्विक पातळीवर सामाजिक सेवाकार्य करणाऱ्या लायन्स इंटरनॅशनल या संस्थेने दृष्टिहिनांना नवजीवन देणारा 'नया सवेरा' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणार असल्याची घोषणा केली आहे. लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234D2 चे नवनियुक्त प्रांतपाल राजेश अग्रवाल यांनी काल श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या पत्रकार परिषदेचे आयोजन राजेश अग्रवाल यांच्या प्रांतपालपदी निवड झाल्यानंतर भविष्यात लायन्सतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी करण्यात आले होते. यावेळी लायन्स क्लबचे माजी इंटरनॅशनल डायरेक्टर नरेंद्र भंडारी, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अभय शास्त्री, कॅबिनेट सचिव सलील कारखानीस आणि कॅबिनेट कोषाध्यक्ष रामचंद्र शाह यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रांतपाल राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, पुणे, अहमदनगर (अहिल्यानगर) आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये लायन्स इंटरनॅशनलचे ११४ क्लब कार्यरत असून, सुमारे साडेपाच हजार सदस्य आणि एक लाखांहून अधिक स्वयंसेवक सेवा देत आहेत. दरवर्षी १०० पेक्षा अधिक कायमस्वरूपी प्रकल्पांद्वारे आणि हजारो सेवाभावी उपक्रमांद्वारे सुमारे ५ लाख गरजू नागरिकांना मदत दिली जाते. गरजूंना अन्नदान, युवक कल्याण, पर्यावरण संवर्धन, डायबिटीस नियंत्रण, बालपणातील कर्करोग (चाइल्डहुड कॅन्सर) यासह विविध क्षेत्रांत लायन्स क्लब मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे.

ते पुढे म्हणाले की, लायन्स इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट 3234D2 तर्फे देखील मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवले जातात. यात दरवर्षी ५ हजार गरजू रुग्णांना मोफत नेत्र तपासणी, उपचार व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, १०० हून अधिक डायलिसिस मशीन्सद्वारे रुग्णांना उपचार, मोफत ओपीडी, दंत उपचार व फिजिओथेरपी केंद्रे चालवली जातात. या कार्याला आणखी पुढे नेण्याचे काम केले जाणार आहे. आगामी काळात २ लाख विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी व उपचार केले जातील. गर्भाशयाच्या कर्करोगावर जनजागृती आणि मोफत लसीकरण मोहीम राबवली जाईल. 'नया सवेरा' हा अंधत्व निर्मूलनासाठीचा पाच वर्षांचा व्यापक प्रकल्प राबवला जाणार असून, हा उपक्रम दृष्टिहिनांना नवसंजीवनी देणारा ठरणार आहे, असे अग्रवाल यांनी नमूद केले.


Lions International, New Initiatives, Social Service, Eye Care, Healthcare Project, Pune

 #LionsInternational #NayaSavera #RajeshAgarwal #SocialService #EyeCare #Healthcare #Pune #Nashik #Ahmednagar #CommunityService

लायन्स इंटरनॅशनलतर्फे 'नया सवेरा' महत्त्वाकांक्षी प्रकल्प; दृष्टिहिनांना मिळणार नवसंजीवनी लायन्स इंटरनॅशनलतर्फे 'नया सवेरा' महत्त्वाकांक्षी प्रकल्प; दृष्टिहिनांना मिळणार नवसंजीवनी Reviewed by ANN news network on ६/१२/२०२५ ०८:३४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".