वारी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिका सज्ज; आयुक्तांनी केली मार्गाची पाहणी

 

पिंपरी, दि. १४ जून २०२५: संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सज्ज झाली आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज (शुक्रवारी) पालखी मार्गाची स्वतः पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी १९ जून रोजी भक्ती-शक्ती चौकात दाखल होणार असून, संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी २० जून रोजी शहरात प्रवेश करेल.

या पाहणी दौऱ्यावेळी विठ्ठल मंदिराचे विश्वस्त तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, देवन्ना गट्टूवार, नितीन देशमुख, उपायुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, राजेश आगळे, क्षेत्रीय अधिकारी किरणकुमार मोरे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, कार्यकारी अभियंता विजय वाईकर, वैशाली ननावरे, नितीन देशमुख, शिवाजी वाडकर, संतोष दुर्गे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढवळे, सहायक आरोग्याधिकारी राजू साबळे तसेच पोलीस निरीक्षक बापू डेरे, भोजराज मिसाळ यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्तांचे महत्त्वाचे निर्देश:

आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी अधिकाऱ्यांना अनेक महत्त्वाचे निर्देश दिले. ते म्हणाले की, पालखी मार्गावर कोणताही अडथळा येणार नाही, याबाबत पोलिसांनी खात्री करून परवानगी दिल्यानंतरच महापालिका परवानग्या देण्याचा निर्णय घेईल. रस्त्यांची डागडूजी आणि विद्युत विभागाची कामे येत्या दोन दिवसांत पूर्ण करावीत. पालखी मार्गावर अडथळा ठरणारी अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत.

पावसाळ्याच्या अनुषंगाने आवश्यक आपत्ती व्यवस्थापन करावे आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करावे, असेही आयुक्तांनी सांगितले. तसेच, तातडीच्या वैद्यकीय सुविधेसाठी आवश्यक ठिकाणी महापालिकेच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पालखी मार्गाची आणि मुक्कामाच्या ठिकाणांची पाहणी:

आषाढीवारी पालखीने पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीमध्ये प्रवेश केल्यानंतर, निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात सर्व वारकरी बांधव, विश्वस्त आणि दिंडीप्रमुख यांचे महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे स्वागत केले जाणार आहे. या ठिकाणी उभारण्यात येणारा स्वागत कक्ष आणि करण्यात येणाऱ्या व्यवस्थेबद्दलची माहितीही आयुक्त सिंह यांनी पाहणी दौऱ्यात घेतली.

याशिवाय, जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम असलेल्या आकुर्डी येथील विठ्ठल मंदिराचीही त्यांनी पाहणी करत माहिती घेतली. खराळवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, खंडोबा माळ परिसर, काळभोर नगर यासह पालखी मुक्कामाच्या इतर ठिकाणांची पाहणी करून आयुक्त सिंह यांनी तयारीचा सविस्तर आढावा घेतला.


Pimpri Chinchwad, Ashadhi Wari, Palkhi Sohala, Sant Tukaram Maharaj, Sant Dnyaneshwar Maharaj, Commissioner Shekhar Singh, Civic Preparedness, Public Works

 #PimpriChinchwad #AshadhiWari #PalkhiSohala #SantTukaram #SantDnyaneshwar #PCMC #PalkhiPreparedness #Wari2025 #Maharashtra

वारी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिका सज्ज; आयुक्तांनी केली मार्गाची पाहणी वारी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिका सज्ज; आयुक्तांनी केली मार्गाची पाहणी Reviewed by ANN news network on ६/१४/२०२५ ०९:२१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".