पुणे : पुणे शहरातील वाघोली येथील पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इंजिनीअरिंगच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट ६ ने प्राध्यापकासह चार जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राध्यापक प्रतिक किसन सातव (वय ३७) आणि त्याचे साथीदार आदित्य यशवंत खिलारे (वय २०), अमोल अशोक नागरगोजे (वय १९) आणि अनिकेत शिवाजी रोडे (वय २०) यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींनी संगनमत करून विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० हजार ते ५० हजार रुपये घेतले आणि परीक्षेत पास करण्याचे आश्वासन दिले होते.
या कारवाईत गुन्हे शाखेच्या अधिकारी पंकज देशमुख, निखिल पिंगळे, गणेश इंगळे यांच्यासह युनिट ६ चे प्रभारी वाहिद पठाण यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
#PuneNews #EducationFraud #EngineeringCollege #AcademicScam #CrimeBranch #ExamMalpractice #PunePolice #EducationCrime #CollegeFraud #Maharashtra
Reviewed by ANN news network
on
६/०३/२०२५ ०२:५३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: