पुणे: वारजे माळवाडी येथे 'दर्या बार'समोर मध्यरात्री दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या तिघांनी एका तरुणाला शिवीगाळ करत लोखंडी हत्याराने मारहाण केली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून, परिसरात दहशत निर्माण केली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे, तर त्यांचा एक साथीदार फरार आहे.
या प्रकरणी एका पुरुष फिर्यादीने (वय २६ वर्षे, रा. वारजे माळवाडी, पुणे) तक्रार दिली आहे. आरोपींमध्ये आदित्य अशोक मारणे (वय ३० वर्षे, रा. श्रीरामकृपा अपार्टमेंट, दत्तनगर वारजे, पुणे) आणि विकी गेंदालाल करंजाळे (वय ३० वर्षे, रा. सदगुरु प्रेस्टीज, उत्तमनगर पुणे) यांना अटक करण्यात आली असून, त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे.
दि. ०९/०६/२०२५ रोजी रात्री ००:३० वाजण्याच्या सुमारास दर्या बारसमोरील मोकळ्या जागेत ही घटना घडली. फिर्यादी त्यांचे मित्र यांच्यासह वॉशरूमसाठी नमूद ठिकाणी गेले असता, नमूद तीन इसम दारू पिऊन गोंधळ घालत होते. 'आमचे समोर गोंधळ करायचा नाही' असे म्हणत त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर, त्यांनी हातातील बिअरची बाटली आणि लोखंडी हत्याराने फिर्यादीला मारून गंभीर दुखापत केली आणि सदर भागात दहशत पसरवली.
या प्रकरणी वारजे स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक २४४/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२) (गैरवर्तनाबद्दल शिक्षा), ११५ (२) (गुन्हा करण्यासाठी प्रोत्साहन), ३५१ (२) (३) (हल्ला), ३५२ (गैरहल्ला), ३ (५) (गुन्हेगारी कट), आर्म्स अॅक्ट ४ (२५) (अवैध शस्त्र बाळगणे), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट ७, आणि महाराष्ट्र अधिनियम ३ (९) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास उपनिरीक्षक सुनिल जगदाळे करत आहेत.
- ------------------------------------------------------------------------------------------------------------- Crime, Assault, Public Disturbance, Warje Malwadi, Pune, Arrest
- #WarjeMalwadiCrime, #Assault, #PunePolice, #PublicDisorder, #Arrest
Reviewed by ANN news network
on
६/१०/२०२५ ०८:२०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: