पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध ऑनलाइन सेवा आणि सुविधा येत्या शुक्रवार, १३ जून २०२५ रोजी रात्री ८.०० वाजल्यापासून ते सोमवार, १६ जून २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. संगणक प्रणालींची तांत्रिक देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
मनपाच्या वतीने मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी याबाबत आवाहन केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑनलाइन सेवा नागरिकांसाठी अविरतपणे उपलब्ध ठेवण्यासाठी संगणक प्रणालींची तांत्रिक देखभाल आणि दुरुस्ती नियमितपणे करणे आवश्यक असते. याच कामासाठी हा तीन दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
या कालावधीत नागरिकांना ऑनलाइन सेवा वापरता येणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या काळात नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा किंवा नंतर ऑनलाइन सेवांचा लाभ घ्यावा, असे सूचित करण्यात आले आहे.
Pimpri Chinchwad Municipal Corporation, Online Services, System Maintenance, Public Notice
#PCMC #PimpriChinchwad #OnlineServices #SystemMaintenance #PublicNotice #PuneNews #Mahanagarpalika

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: