अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृत मैथिलीच्या कुटुंबियांचे खा. सुनील तटकरेंनी केले सांत्वन

 


उरण, दि. १५ जून २०२५ (प्रतिनिधी): अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मैथिली मोरेश्वर पाटील हिच्या न्हावा (उरण) येथील घरी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी भेट देऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी मैथिलीचे वडील मोरेश्वर पाटील यांनी "भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि कुणावरही असा प्रसंग येऊ नये हीच ईश्वराला प्रार्थना," अशी आर्त विनवणी तटकरे यांच्याकडे केली. हे सांगताना ते अक्षरशः ओक्साबोक्सी रडले.

यावेळी खासदार तटकरे यांनी मोरेश्वर पाटील यांचे दुःख मोठे असल्याचे सांगत, स्वतःला सावरून घेण्याची आणि इतर दोन मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची विनंती केली.

पाटील कुटुंबियांना दिलासा:

या सांत्वनपर भेटीवेळी उरण तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष परिक्षीत ठाकूर, माजी अध्यक्ष मनोज भगत, ज्येष्ठ कार्यकर्ते अजित पाटील, उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, भूषण ठाकूर, रमण कासकर, माजी सरपंच तथा मैथिलीच्या आईचे मामा जितेंद्र म्हात्रे, विद्यमान सरपंच विजेंद्र पाटील, उपसरपंच शैलेश पाटील, ॲड. विरा म्हात्रे, मिनाक्षी पाटील, अनिशा पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मोरेश्वर पाटील यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत मैथिलीच्या अनेक आठवणी सांगितल्या. मैथिली ही अतिशय देवभक्तीवाली होती आणि ती नेहमी जपमाळ जपत असे. तिच्या बॅगमध्ये एक जपमाळ असायची आणि दुसरी जपमाळ घरी असायची. "आम्हा सर्वांसाठी आणि भावंडांसाठी ती एक प्रेरणा होती. तिच्या जाण्यावर आमचा अजूनही विश्वासच बसत नाही," असे त्यांनी तटकरे यांना माहिती देताना सांगितले.

सरकारकडे मदतीची मागणी:

याचबरोबर, मैथिलीची लहान बहीण सध्या बायो-टेकमध्ये शिक्षण घेत असून, लहान भाऊ ट्रेनिंग शिप रहेमानमध्ये यावर्षी अकरावीला आहे. त्यांच्या भवितव्यासाठी सरकारने काहीतरी करावे, अशी विनंती देखील मोरेश्वर पाटील यांनी यावेळी केली.

यावर तटकरे यांनी पाटील कुटुंबीयांना आश्वस्त करताना सांगितले की, "आम्ही सगळे आपल्यासोबत आहोत आणि योग्य ते सर्व सहकार्य केले जाईल." तसेच, मैथिलीचे शव लवकरात लवकर मिळावे यासाठी आपण आत्ताच गृहमंत्र्यांशी थेट बोललो असून, ते आज किंवा उद्यापर्यंत मिळेल, असे आश्वासन तटकरे यांनी दिले. त्यानंतर तटकरे यांनी मुंबईकडे प्रस्थान केले.


 Ahmedabad Plane Crash, Condolence Visit, Sunil Tatkare, Maithili Patil, Uran, Raigad, NCP, Family Support, Tragic Incident

 #AhmedabadPlaneCrash #SunilTatkare #MaithiliPatil #Uran #Condolence #Tragedy #Raigad #NCP #Maharashtra

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृत मैथिलीच्या कुटुंबियांचे खा. सुनील तटकरेंनी केले सांत्वन अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृत मैथिलीच्या कुटुंबियांचे खा. सुनील तटकरेंनी केले सांत्वन Reviewed by ANN news network on ६/१५/२०२५ ०७:२६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".