महापालिकेच्या तीन रुग्णालयांत आयुर्वेद व होमिओपॅथी उपचार उपलब्ध होणार;आमदार अमित गोरखे यांच्या प्रयत्नांना यश
पिंपरी-चिंचवड, दि. ६ ऑगस्ट २०२५: पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आता महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पुन्हा एकदा आयुर्वेद आणि होमिओपॅथीचे उपचार मिळणार आहेत. आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील तीन रुग्णालयांमध्ये या ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना स्वस्त आणि सोप्या पद्धतीने उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यापूर्वी वायसीएम रुग्णालयातील आयुर्वेदिक ओपीडी बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. आमदार गोरखे यांनी विधानपरिषदेमध्ये हा मुद्दा मांडला होता आणि महापालिका आयुक्तांनीही या संदर्भात लक्ष घातले होते. या मागणीनंतर झालेल्या बैठकीत आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
याच बैठकीत आमदार गोरखे यांनी इतरही अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या. यामध्ये निगडी-दापोडी अर्बन स्ट्रीट प्रकल्पातील निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणे, शहराच्या प्रारूप विकास आराखड्यातील आरक्षण बदलांवर आक्षेप घेत तो नव्याने तयार करणे, श्वान हल्ल्यांवर उपाययोजना आणि पशुवैद्यकीय विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अचानक रद्द होण्यावर धोरण ठरवणे या मागण्यांचा समावेश होता. आयुक्तांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये शहराला मिळालेल्या यशाबद्दल आमदार गोरखे यांनी आयुक्त आणि महापालिका कर्मचाऱ्यांचे अभिनंदनही केले.
Pimpri Chinchwad, MLA Amit Gorkhe, Ayurveda, Homeopathy, OPD, Municipal Hospital, Healthcare.
#PimpriChinchwad #Ayurveda #Homeopathy #MunicipalCorporation #AmitGorkhe #Healthcare #OPD

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: