पुणे: कोथरूड येथील एका महिलेची शेअर ट्रेडींगमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन माध्यमातून ४७ लाख ६८ हजार २८८/- रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. मोबाईल धारक आणि बँक खातेधारकांनी विश्वास संपादन करून हा गंडा घातला आहे.
या प्रकरणी एका महिला फिर्यादीने (वय ४१ वर्षे, रा. कोथरूड, पुणे) तक्रार दिली आहे. आरोपींमध्ये मोबाईल धारक व बँक खातेधारक वापरकर्ते यांचा समावेश असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
दि. २७/०२/२०२५ ते २२/०५/२०२५ रोजीपर्यंत ऑनलाइन माध्यमाद्वारे ही फसवणूक झाली. फिर्यादींना नमूद मोबाईल धारक व बँक खातेधारकांनी फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यांनी शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करून त्यामधून चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून फिर्यादींची ४७,६८,२८८/- रुपये किमतीची आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी कोथरूड स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक १५८/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) (फसवणूक), ३१९ (२) (विश्वासघात), ३ (५) (गुन्हेगारी कट) आणि आयटी अॅक्ट ६६ (डी) (संगणकाशी संबंधित गुन्हा) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास निरीक्षक (गुन्हे) विक्रमसिंह कदम करत आहेत.
- --------------------------------------------------------------------------------------------------------------
- Cyber Crime, Online Fraud, Investment Scam, Kothrud, Pune, Financial Crime
- #OnlineFraud, #InvestmentScam, #CyberCrime, #KothrudCrime, #PunePolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: