दि. बा. पाटील यांच्या १२ व्या स्मृतीदिनी जासई येथे आंदोलन
उरण, दि. ६ जून २०२५: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची अधिसूचना तात्काळ काढण्यात यावी, या मागणीसाठी दि. बा. पाटील यांचे शिष्य आणि कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील २४ जून २०२५ रोजी (दि. बा. पाटील यांच्या १२ व्या स्मृतीदिनी) जासई येथे आमरण उपोषण सुरू करणार आहेत. जासई येथील दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याजवळ हे उपोषण होईल.
२०२० पासून या नामकरणासाठी आंदोलन सुरू असून, महाराष्ट्र विधानसभेने ठराव करून तो केंद्राकडे १६ जुलै २०२२ रोजी पाठवला आहे. वारंवार बैठका होऊनही अद्याप निर्णय न झाल्याने जनतेत संभ्रम आणि असंतोष आहे. विमानतळाच्या उद्घाटनाच्या अनेक तारखा पुढे ढकलल्या जात असून, नावाची अधिसूचना अद्याप निघालेली नाही.
प्रमुख मागण्या:
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची अधिसूचना तात्काळ काढण्यात यावी.
- विमानतळात विस्थापित, प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना प्रशिक्षण व रोजगार मिळावा.
या मागण्या २३ जून २०२५ पर्यंत मान्य न झाल्यास २४ जूनपासून उपोषण सुरू होईल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास महाराष्ट्र शासन जबाबदार असेल, असा इशारा भूषण पाटील यांनी दिला आहे. त्यांनी यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे.
#NaviMumbaiAirport #DBPatil #BhushanPatil #HungerStrike #Uran #AirportNaming #Protest #Maharashtra #ProjectAffected #JNPT
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२५ १०:१४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: