किरकोळ वादातून चिंचवडमध्ये मारामारी; एकाला चाकूने भोसकले

 


पिंपरी चिंचवड: पिंपरी येथे खोलीबाहेर न आल्याच्या किरकोळ कारणावरून एका व्यक्तीला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आणि चाकूने हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०४/०६/२०२५ रोजी पहाटे ०१:१५ वाजण्याच्या सुमारास विद्यानगर, चिंचवड, पुणे येथे ही घटना घडली. राजेश बाबू कुमार (वय २४ वर्षे, धंदा-मजुरी, रा. विद्यानगर, देशी दारू दुकाणा जवळ, ए-१ चिकन शॉपचे बाजूला, चिंचवड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, ते लघवीसाठी रूमच्या बाहेर आले असता, आरोपी राजपूत (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) आणि त्याचे दोन मित्र यांनी त्यांना आपल्याजवळ बोलावले. राजेश बाबू कुमार त्यांच्याजवळ गेले नाहीत या कारणावरून आरोपींना राग आला. त्यांनी राजेशला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. एवढेच नाही तर, एका अनोळखी इसमाने राजेशच्या रूममधील कांदा कापण्याचा चाकू घेऊन त्याच्या पाठीवर व मानेवर मारून त्याला जखमी केले.

या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिला पोलीस उपनिरीक्षक सोळुंखे पुढील तपास करत आहेत. आरोपींचा शोध सुरू आहे.

  • --------------------------------------------------------------------------------------------------------------------: #PimpriCrime, #KnifeAttack, #Assault, #PimpriChinchwad, #CrimeNews
किरकोळ वादातून चिंचवडमध्ये मारामारी; एकाला चाकूने भोसकले किरकोळ वादातून चिंचवडमध्ये मारामारी; एकाला चाकूने भोसकले Reviewed by ANN news network on ६/०६/२०२५ ०४:१३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".