
अवैध वाळू उपशासाठी लाचखोरीचा बाजार; अंबडच्या तहसीलदाराला छत्रपती संभाजीनगरात लाप्रविने पकडले!
छत्रपती संभाजीनगर/बीड, दि. ११ जून २०२६: जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार (वर्ग-१) विजय लक्ष्मण चव्हाण (वय ४७ वर्ष, रा. रो-हाऊस नं. ११९, कासलीवल मार्बल सोसायटी, वेस्ट बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर) यांना ६ लाख ४० हजार रुपयांची भरघोस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) बीडच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्या पोकलेन मशीनवर कारवाई न करण्यासाठी आणि ६ हायवा टीप्परला वाळू वाहतूक करू देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. ६ जून २०२६ रोजी पंचांसमक्ष छत्रपती संभाजीनगर शहर हद्दीतील सातारा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात हा धडक सापळा यशस्वी करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
या कारवाईची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, मूळ तक्रारदार हे वाळू वाहतूक व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यांच्या अवैध वाळू उपसा करणाऱ्या पोकलेन मशीनवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात तहसीलदार विजय चव्हाण यांनी प्रति दिवस याप्रमाणे ८ दिवसांचे तब्बल १२,००,००० रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी ८,००,००० रुपये तक्रारदाराने चव्हाण यांना आधीच दिले होते. उर्वरित ४,००,००० रुपये आणि नवीन ६ हायवा टीप्परद्वारे वाळू वाहतूक करण्यासाठी प्रति टीप्पर ५०,००0 रुपये प्रमाणे ३,००,००० रुपये, अशी एकूण ७,००,००० रुपयांची नवीन मागणी २६ मे २०२६ रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत समोर आली होती.
तथापि, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बीड एसीबीकडे तक्रार नोंदवली. अखेर तडजोडीअंती पोकलेन मशीनचे उर्वरित ४,००,००० रुपये आणि ६ हायवा टीप्परचे प्रत्येकी ४०,००० रुपयांप्रमाणे २,४०,००० रुपये, असे एकूण ६,४०,००० रुपये देण्याचे निश्चित झाले. ६ जून २०२६ रोजी शासकीय पंचांसमक्ष रचलेल्या सापळ्यात ही ६ लाख ४० हजारांची रक्कम स्वीकारताना तहसीलदार चव्हाण यांना त्यांच्या निवासस्थानाजवळ रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
सदरची कामगिरी लाप्रवि छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे आणि अपर अधीक्षक श्री. शशिकांत शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड युनिटचे पोलीस उप अधीक्षक सोपान चिट्टमपल्ले, अंमलदार मच्छिंद्र बीडकर, प्रदीप सुरवसे, अमोल खरसाडे आणि चालक अंबादास पुरी यांनी केली आहे.
Labels: Ambad Tahsildar Arrest, Vijay Laxman Chavan ACB, Beed Anti Corruption Bureau, Chhatrapati Sambhajinagar Crime, Sand Mining Corruption Case
. Search Description: Ambad Class-1 Tahsildar Vijay Laxman Chavan arrested by Beed ACB for accepting a bribe of Rs 6,40,000 regarding illegal sand mining operations
. Hashtags: #JalnaACB #AntiCorruption #TahsildarArrested #SandMafiaCrackdown #SambhajinagarCrime #BeedACB #CorruptionFreeIndia
६ लाख ४० हजारांची लाच घेताना तहसीलदार गजाआड!
Reviewed by ANN news network
on
६/११/२०२६ ०४:१९:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
६/११/२०२६ ०४:१९:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: