पिंपरी चिंचवड, ता. ९ जून: पिंपरी-चिंचवड परिसरातील तळवडे आणि आसपासच्या रेड झोन संरक्षण क्षेत्रात मोडणाऱ्या भूखंडांवर राज्य सरकारने खरेदी-विक्री व्यवहारांवर बंदी घातलेली असतानाही, खुलेआम बेकायदेशीर भूमी व्यवहार सुरू आहेत. या प्रकरणात कामगार वर्गातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात असल्याचा आरोप आहे. "तळवडे, चिखली, दिघी, बोपखेल, यमुना नगर, त्रिवेणी नगर या भागातील जमीन व्यवहारांची तातडीने चौकशी करण्यात यावी. एजंट व बिल्डर यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि नागरिकांच्या मालमत्तेची व नोंदणी रद्द केली जावी," अशी मागणी भाजपा पिंपरी-चिंचवड शहराचे चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे. या गंभीर प्रकारामुळे पिंपरी-चिंचवडमधील भूमी व्यवहारांतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काळभोर यांच्या म्हणण्यानुसार.....
फसवणुकीचे स्वरूप:
काही एजंट्स आणि बिल्डर संगनमताने दुय्यम निबंधक कार्यालयाच्या माध्यमातून बनावट किंवा अपूर्ण माहितीच्या आधारे हे बेकायदेशीर खरेदी-विक्री व्यवहार करत आहेत. तळवडे, रुपी नगर, टॉवर लाईन, चिखली, साने चौक, मोरे वस्ती, पाटील नगर, देहू गाव, चव्हाण वस्ती आदी परिसरात हे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी रेड झोनमधील या जागांवर स्पष्ट बंदी आदेश जारी केला असतानाही, एजंट आणि बिल्डर नागरिकांकडून मोठी आर्थिक रक्कम घेऊन बेकायदेशीररित्या मालमत्ता नोंदणी करत आहेत.
नियमांचे उल्लंघन आणि संगनमताचा संशय:
सातबारा उताऱ्यावर नोंदणीसाठी किमान ११ गुंठे भूखंडाची अट असतानाही, या नियमांचे सर्रास उल्लंघन करून १-२ गुंठ्यांच्या जागा देखील पैसे घेऊन नोंदवल्या जात आहेत. या संपूर्ण प्रकारात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील काही करसंकलन अधिकारी, स्थानिक एजंट आणि राजकीय पाठबळ असलेले बिल्डर सामील असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, सामान्य नागरिकांचा आर्थिक आणि मानसिक छळ होत आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे प्रशासन या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही केला जात आहे.
Pune Real Estate, Red Zone Scam, Pimpri-Chinchwad, Land Fraud, Illegal Transactions, Builder-Agent Nexus, Government Land, Corruption, Worker Exploitation, BJP Demands
#PimpriChinchwad #RedZoneScam #LandFraud #RealEstateIndia #Corruption #IllegalLandDeals #Maharashtra #WorkerExploitation #BJP #PMC
Reviewed by ANN news network
on
६/०९/२०२५ ०९:०२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: