अनलिमिटेड इनकमिंग कॉल्ससोबतच या पॅकमध्ये भरपूर डेटा, मोफत आऊटगोइंग मिनिटे आणि एसएमएसचे फायदे देखील आहेत. ग्राहकांना २० दिवस आणि ४० दिवसांच्या वैधतेचे दोन पर्याय निवडता येतील. या दीर्घ वैधतेच्या प्लॅन्समुळे यात्रेकरूंना महागड्या आंतरराष्ट्रीय रोमिंग चार्जेसची चिंता न करता सहज संवाद साधता येणार आहे.
आखाती प्रदेशासाठी Vi IR पॅक - एक दृष्टिक्षेप:
सौदी अरेबियामध्ये प्रवासासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे Vi ने आपल्या ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार सर्वोत्तम प्लॅन निवडण्याचे आवाहन केले आहे. कमी कालावधीसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी Vi ने ३ दिवसांच्या लिमिटेड पॅकसह फक्त ४९५ रुपयांपासून परवडणारे IR पॅक देखील आणले आहेत. तर, ट्रूली अनलिमिटेड पॅकच्या फायद्यांसह १ दिवसासाठी ७४९ रुपये किंमत आहे. यामुळे ग्राहकांना परदेशातही अखंडित कनेक्टिव्हिटीचा अनुभव घेता येईल.
सर्व प्रमुख आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅकसोबत अनलिमिटेड इनकमिंग कॉल्ससारख्या विविध पर्यायांसह आणि उत्तम फायद्यांमुळे Vi ने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आकर्षक योजना सादर केल्या आहेत.
..............................
#Vi
#InternationalRoaming
#Haj2025
#SaudiArabia
#TelecomOffer
#UnlimitedIncoming
#TravelConnectivity
#IndiaToGulf

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: