पुणे, दि. २८ (प्रतिनिधी): पुणे शहरातील बंडगार्डन पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेला लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. आगरकर नगर येथील एका रेल्वे तिकीट आरक्षण केंद्राच्या कार्यालयातून अज्ञात चोरट्याने दरवाजा तोडून आत प्रवेश करत ६८ हजार रुपयांचा लॅपटॉप आणि रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करत असताना बंडगार्डन पोलीस ठाण्यातील तपास पथकाला गोपनीय माहिती मिळाली. तसेच, घटनास्थळा परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करण्यात आली. या तपासाच्या आधारे पोलिसांनी सोमनाथ योगेश चौधरी (वय २२ वर्षे, रा. धारवडकर कॉलनी, गोपाळपट्टी, मांजरी, पुणे) याला ताब्यात घेतले.
चौधरी याच्याकडून चोरीला गेलेला ३५ हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप आणि गुन्हा करतेवेळी वापरलेली दुचाकी पोलिसांनी पंचनाम्याने जप्त केली आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी मार्गदर्शन केले होते.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग, पुणे श्री. दिपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलकंठ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. संपतराव राऊत, पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील लोहार आणि पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, प्रकाश आव्हाड, सारस साळवी, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, मनिष संकपाळ, महेश जाधव यांच्या पथकाने केली आहे.
- #PuneCrime
- #Housebreaking
- #TheftCase
- #BundgardenPolice
- #LaptopRecovery
- #CCTV
- #PunePolice
Reviewed by ANN news network
on
५/२९/२०२५ ०९:५९:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: