पिंपरी, १४ मे २०२५: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे.
महापालिकेच्या एकूण २,५९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, ज्यात मराठी माध्यमातील २,१५५ विद्यार्थ्यांपैकी १,९६६ आणि उर्दू माध्यमातील ४४२ विद्यार्थ्यांपैकी ४३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे एकूण प्रमाण ९४.२० टक्के आहे.
दहावीच्या परीक्षेत चांगलं यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा महापालिकेकडून आर्थिक प्रोत्साहन देऊन गौरव केला जाणार आहे. ८० ते ८४.९९ टक्के गुण मिळवणाऱ्या ९५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५,००० रुपये, ८५ ते ८९.९९ टक्के गुण मिळवणाऱ्या ६२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०,००० रुपये आणि ९० ते १०० टक्के गुण मिळवणाऱ्या १८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच, परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ७ दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०,००० रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, "दहावीच्या परीक्षेत महापालिकेच्या शाळांनी चांगली कामगिरी केली आहे. या निकालात शिक्षकांचे मोठे योगदान आहे. उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.७४ टक्के असणे हे विशेष उल्लेखनीय आहे."
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, "महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष दिले जाते. दिव्यांग विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. शिक्षणासोबतच समावेशकतेवर भर देणे हे आमचे ध्येय आहे."
सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात म्हणाले, "महापालिका शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सतत प्रयत्न केले जातात. या निकालामुळे आमच्या प्रयत्नांना यश आले आहे."
--------------------------------------
#PCMCEducation
#10thResults
#StudentAchievements
#PimpriChinchwad
#Education
Reviewed by ANN news network
on
५/१४/२०२५ ०२:५९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: