कल्याणी स्कूलचे सी.बी.एस.ई. परीक्षेत यश; दहावी, बारावीत शंभर टक्के निकाल

 


पुणे, १४ मे २०२५ - पुण्यातील कल्याणी स्कूलने यंदाच्या सी.बी.एस.ई. बोर्ड परीक्षांमध्ये दहावी आणि बारावीमध्ये १००% निकाल मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या या शाळेने निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे.  

बारावीच्या परीक्षेत एकूण ११७ विद्यार्थी सहभागी झाले होते, ज्यात ४५ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. शाळेने पारंपरिक शाखा रचना बाजूला सारून इंटरडिसिप्लिनरी अभ्यासक्रम लागू केल्यामुळे निकाल शाखानिहाय विभागण्यात आले नाहीत.  

यावर्षीच्या टॉपर्समध्ये मुग्धा फाटक (९७.४%), वाई. श्री लक्ष्मी मानसा (९७.२%) आणि अनिश गंगावरम (९६.६%) यांचा समावेश आहे.  

दहावीच्या परीक्षेत ११५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, ज्यात ७५ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवले.    

दहावीच्या टॉपर्समध्ये अर्णव पक्कला (१००%), सिया पियुष धगर (९९.४%), श्रेया कुडनूर (९९%) आणि ईशा जैन (९३%) यांचा समावेश आहे. ईशा जैनला दृष्टीदोष असूनही तिने मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

या निकालांवर प्रतिक्रिया देताना शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल वडडन म्हणाल्या, की या यशात विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांच्या समर्पण भावनेचाही मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, जिज्ञासा आणि मूल्याधिष्ठित शिक्षण घेतले, असेही त्या म्हणाल्या.  

शाळेच्या संचालिका दीक्षा कल्याणी यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. शाळेचे ‘करुणेने प्रेरित महत्त्वाकांक्षा’ हे तत्वज्ञान या निकालांमुळे अधिक दृढ झाले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.  

या निकालामुळे शाळेत आनंदाचे वातावरण असून, कल्याणी स्कूल ही पुण्यातील दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.   

----------------------------------------------------

 #KalyaniSchool

#CBSEresults

#PuneEducation

#SchoolResults

#AcademicExcellence

कल्याणी स्कूलचे सी.बी.एस.ई. परीक्षेत यश; दहावी, बारावीत शंभर टक्के निकाल कल्याणी स्कूलचे सी.बी.एस.ई. परीक्षेत यश; दहावी, बारावीत शंभर टक्के निकाल Reviewed by ANN news network on ५/१४/२०२५ ०२:३५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".