पिंपरी-चिंचवड : शत्रुघ्न काटे भाजप शहराध्यक्षपदी विराजमान

 


पिंपरी-चिंचवड: भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर शत्रुघ्न (बापू) काटे यांनी आज अधिकृतपणे शहराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. मोरवाडी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या समारंभात, पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक निरीक्षक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते मावळते शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याकडून त्यांनी हे पद स्वीकारले.

मावळते शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांनी नवनियुक्त अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. "शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक उंची गाठेल. त्यांनी आतापर्यंत केलेले कार्य खूप चांगले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत होईल," असे आमदार शंकर जगताप म्हणाले.

कार्यक्रमात बोलताना शत्रुघ्न काटे यांनी पक्षाने सोपवलेल्या जबाबदारीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. "पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात तसेच मावळते शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना अधिक मजबूत करण्यावर भर राहील. शहरातील 4500 सक्रिय सदस्य आणि 3 लाख प्राथमिक सदस्यांच्या सहकार्याने संघटन वाढविण्याचे काम करणार असून, जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेची कामे मार्गी लावण्यास प्राधान्य राहील. गेल्या तीन वर्षांपासून जनतेची कामे निरंतर सुरू असून, आगामी महापालिका निवडणुका ताकदीने लढवल्या जातील. पक्षात कोणाचीही नाराजी नसून, शहरातील आमदार आणि माजी पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना काम करेल. पक्षात दूजाभाव होणार नाही, याची दक्षता घेऊन पुढील 20 दिवसांच्या कालावधीत कार्यकारिणी गठित केली जाईल," असे नवनियुक्त शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले.

यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप यांनी शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमाला शहरातील अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

------------------------------------------------------

#PimpriChinchwad #BJP #PoliticalNews #Maharashtra #CityPresident #ShatrughnaKate

पिंपरी-चिंचवड : शत्रुघ्न काटे भाजप शहराध्यक्षपदी विराजमान पिंपरी-चिंचवड : शत्रुघ्न काटे भाजप शहराध्यक्षपदी विराजमान Reviewed by ANN news network on ५/१६/२०२५ ०९:४२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".