मुंबई (प्रतिनिधी) - अमळनेर मतदारसंघातून दोन वेळा काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवलेले डॉ. अनिल शिंदे यांच्यासह अमळनेर तालुक्यातील अनेक सरपंच, माजी सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील माजी नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, माजी शहराध्यक्ष आणि जिल्हा उपाध्यक्षांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, जळगाव पश्चिमचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राध्येश्याम चौधरी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. प्रवेश केलेल्या सर्वांचा पक्षात योग्य सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
डॉ. अनिल शिंदे यांच्यासोबत काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये नीळकंठ पाटील, गांधलीचे सरपंच नरेंद्र पाटील, पातोंडा आणि कंडारीचे माजी सरपंच सुनील पवार आणि डॉ. पुरुषोत्तम सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष इलेक्टोपॅथी डॉक्टर संघटना डॉ. हिंमत सूर्यवंशी, माजी ग्रामपंचायत सदस्य (पाडळसरे) रणछोड पाटील यांचा समावेश आहे. शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगरसेवक आणि शहराध्यक्ष श्याम पाटील, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दयाराम पाटील, राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दर्पण वाघ, युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष कुणाल चौधरी, जळगाव राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध शिसोदे, संभाजी पाटील, सुमित पाटील, संभाजी ब्रिगेडचे संदीप पाटील यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.
------------------------------------
#BJP
#Congress
#NCPSharadPawar
#Amalneer
#ChandrashekharBawankule
#PoliticalDefection
#MaharashtraPolitics
Reviewed by ANN news network
on
५/१४/२०२५ १२:१६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: