पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई १४ मे २०२५ रोजी करण्यात आली असून, याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात ‘श्री ट्रेडिंग’ या कंपनीतून वायू गळती होत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत होती. याबाबत नागरिकांनी पर्यावरण विभागाकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर कारवाई करताना कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील यांनी २४ एप्रिल रोजी कंपनीमध्ये स्थळ पाहणी करून पंचनामा केला.
स्थळपाहणीनंतर, स्वप्नील पाटील यांनी संबंधित कंपनीवर पुढील कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाच मागितली. हा प्रकार सहन न झाल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. ACB ने खात्री करून १४ मे २०२५ रोजी सापळा रचला.
तयार करण्यात आलेल्या सापळ्याअंतर्गत, पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर रस्त्यावर स्वप्नील पाटील यांनी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारली, त्याच क्षणी ACB च्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ अटक केली. या कारवाईनंतर त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकारामुळे पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. नागरिकांकडून अपेक्षा आहे की, प्रशासन अशा प्रकरणांमध्ये कठोर भूमिका घेईल आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वेळेवर कारवाई करून इतरांना धडा शिकवेल.
–-----------////
#PimpriChinchwad
#PCMC
#CorruptionNews
#ACBTrap
#PuneNews
#BriberyCase
#MunicipalScam
#SwapnilPatil
#PCMCScandal
#AntiCorruption

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: