जालना: खरीप हंगामाच्या तोंडावर जालना येथे कृषी विभागाने मोठी कारवाई करत उत्पादनास परवानगी नसलेल्या फॉस्फोजिप्सम या खताचा तब्बल वीस लाख रुपये किमतीचा ३२० मेट्रिक टन साठा जप्त केला आहे. कृषी विभागाच्या पथकाने बुधवार, दिनांक २८ मे २०२५ रोजी जालना-राजूर मार्गावर गुंडेवाडी शिवारात कृष्णा फास्केईम लिमिटेड या कंपनीने भाड्याने घेतलेल्या गोदामांवर छापा टाकला. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी, मोहीम अधिकारी निलेशकुमार भदाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या कायदेशीर जबाबदार व्यक्तींसह संचालक मंडळावर खत नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ व भारतीय न्याय संहिता यांच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाने अचानक केलेल्या या कारवाईमुळे बनावट खतांचा साठा करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामाच्या तोंडावर ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------
#Jalna #FertilizerSeizure #FakeFertilizer #AgricultureDepartment #CrimeNews #Maharashtra
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: