हडपसरमध्ये ऑनलाईन फसवणूक, महिलेची ४३ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक
पुणे: हडपसर परिसरात एका ३८ वर्षीय महिलेची ऑनलाईन माध्यमातून तब्बल ४३ लाख ९१ हजार १६० रुपयांची फसवणूक झाली आहे. ही घटना ३ मे २०२५ ते ८ मे २०२५ दरम्यान घडली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारक व लिंक धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला अज्ञात मोबाईल धारकाने ऑनलाईन टास्क देऊन अकाउंट तयार करण्यास सांगितले. महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आरोपीने तिला युपीआय आयडी व बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. यानंतर आरोपीने महिलेची एकूण ४३ लाख ९१ हजार १६० रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
ही घटना ३ मे २०२५ ते ८ मे २०२५ दरम्यान घडली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निलेश जगदाळे अधिक तपास करत आहेत.
------------------------------------------------------------------------------
#OnlineFraud #CyberCrime #PunePolice #Hadapsar #FinancialScam
Reviewed by ANN news network
on
५/३०/२०२५ ०६:०४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: