पुणे, दि. २८ (प्रतिनिधी): भारती विद्यापीठ पोलिसांनी एका व्यक्तीला अवैध गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. आरोपी अजय दत्तात्रय गायकवाड (वय २४ वर्षे, रा. ५७० आंबेडकरनगर, कुमावत गिरणीजवळ, गल्ली नंबर १८, मार्केटयार्ड, पुणे) याच्याकडून ५०,००० रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मे २०२५ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथक गस्तीवर असताना, पोलीस अंमलदार मंगेश पवार आणि महेश बारवकर यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती लेकटाऊन, महावीर चौक येथे गावठी कट्ट्यासह थांबला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपी अजय गायकवाड याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि नंबर २५८/२०२५, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम पु. साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. राजेंद्र डहाळे यांनी या कामगिरीचे कौतुक केले.
- #PuneCrime
- #IllegalWeapon
- #ArmsSeizure
- #CountryMadePistol
- #PoliceAction
- #PunePolice
- #BharatiVidyapeeth
Reviewed by ANN news network
on
५/२९/२०२५ १२:४५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: