रुबी हॉल किडनी प्रत्यारोपण प्रकरणी डॉ. अजय तावरेला पोलीस कोठडी

 

पुणे - रुबी हॉल क्लिनिकमधील अवैध किडनी प्रत्यारोपण रॅकेट प्रकरणात ससून सर्वोपचार रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय अनिरुद्ध तावरे यांना ०२ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. या गुन्ह्यात यापूर्वी सात जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

तत्कालीन आरोग्य सेवा मंडळ, पुणे उपसंचालक डॉ. संजोग सीताराम कदम यांच्या तक्रारीवरून ११ मे २०२२ रोजी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, १२०(ब), ३४ आणि मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ चे कलम १०, १९ (अ) (ब) (क) व २० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासात असे निष्पन्न झाले आहे की, डॉ. अजय अनिरुद्ध तावरे ससून रुग्णालयातील प्रादेशिक प्राधिकार समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला. बनावट व्यक्ती आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे किडनी स्वॅप प्रत्यारोपणासाठी परवानगी दिल्याचे उघड झाले आहे.

डॉ. तावरे हे सध्या पोर्शे कार अपघात गुन्ह्यात येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. त्यांना न्यायालयाच्या प्रॉडक्शन वॉरंटद्वारे ताब्यात घेऊन २८ मे २०२५ रोजी या किडनी रॅकेट गुन्ह्यात अटक करण्यात आली. २९ मे २०२५ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

या गुन्ह्यात आतापर्यंत सात आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले असून . गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर श्री. गणेश इंगळे करत आहेत.



 #KidneyRacket #RubyHallClinic #SasoonHospital #MedicalCrime #OrganTransplant #PunePolice #IllegalTransplant #MedicalCorruption #PuneNews  #Pune #KidneyRacket  #DrAjayTaware #PoliceCustody #CrimeNews #HumanOrganTransplantation  #PoliceInvestigation

रुबी हॉल किडनी प्रत्यारोपण प्रकरणी डॉ. अजय तावरेला पोलीस कोठडी रुबी हॉल किडनी प्रत्यारोपण प्रकरणी डॉ. अजय तावरेला पोलीस कोठडी Reviewed by ANN news network on ५/३०/२०२५ १०:३९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".