सांगवी पोलिसांची तत्पर कारवाई: आरोपी अटकेत
सांगवी: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ मे २०२५ रोजी रात्री १२:३० वाजता कोकणे चौक ते पवना नगर परिसरात जबरी चोरी आणि मारहाणीची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सुरज नामदेव सुतार (वय ३० वर्षे) याला अटक केली आहे.
फहरान अल्ली शेख (वय २० वर्षे, रा. शांताई रेसीडेन्सीच्या मागे, पवनानगर, पिंपळे सौदागर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या मित्रासह रात्रीच्या वेळी रस्त्याने जात असताना आरोपी सुरज सुतार त्यांच्याकडे आला. आरोपीने त्यांना शिवीगाळ करत "मी या एरियाचा भाई आहे, चुपचाप पैसे द्या" अशी धमकी दिली. जेव्हा त्यांनी पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा आरोपीने त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीचे शर्ट फाटले आणि आरोपीने त्यांच्या शर्टाच्या खिशातून २,००० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चापाले करत आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------------------
#PimpriChinchwad #Crime #Robbery #Assault #PoliceArrest #Sangavi #Maharashtra
Reviewed by ANN news network
on
५/२९/२०२५ ०४:३०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: