पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी कोथरूड येथील गांधी भवनात 'गांधी दर्शन' शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणाऱ्या या शिबिरात तीन प्रमुख विषयांवर मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरे 'सर्वसमावेशक राष्ट्रवादाचे प्रणेते महात्मा गांधी' या विषयावर बोलणार आहेत. तर महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी 'गांधी आणि मौलाना अबुल कलाम आझाद' या विषयावर आणि ज्येष्ठ राज्यशास्त्र अभ्यासक प्रा. राजा दीक्षित 'गांधीजी आणि नैतिकता' या विषयावर मार्गदर्शन करतील.
शिबिरासाठी २०० रुपये नोंदणी शुल्क असून त्यामध्ये नाश्ता, चहा आणि भोजनाचा समावेश आहे. स्पर्धा परीक्षार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क ऐच्छिक ठेवण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी एड. स्वप्नील तोंडे (९९२३५२३२५४) किंवा तेजस भालेराव (९१७२४८७०१९) यांच्याशी संपर्क साधता येईल.
Reviewed by ANN news network
on
११/०६/२०२४ ०१:२२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: