अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त"
पुणे (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे विभागातील भरारी पथक क्रमांक १ आणि ३ यांनी १५ ऑक्टोबरपासून आतापर्यंत केलेल्या कारवाईत ७१ गुन्हे नोंदवून ६९ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत दारू निर्मितीचे ६,८०० लीटर रसायन, २,६१६ लीटर गावठी दारू, ४२५ बल्क लीटर देशी दारू, २६२ बल्क लीटर विदेशी दारू, ४५३ बल्क लीटर बिअर आणि ९१० लीटर ताडी जप्त करण्यात आली. याशिवाय ६ चारचाकी आणि १ दुचाकी वाहनही जप्त करण्यात आले.
भरारी पथकाचे निरीक्षक देवदत्त पोटे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक डी. एस. सूर्यवंशी, पी.ए. कोकरे, वाय. एम. चव्हाण, पी.ए. ठाकरे आणि इतर अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
निवडणूक आचारसंहितेच्या काळात अवैध मद्य वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागाने तात्पुरते तपासणी नाके उभारले असून, यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे निरीक्षक पोटे यांनी सांगितले. अवैध मद्य निर्मिती किंवा वाहतुकीची माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Reviewed by ANN news network
on
११/०६/२०२४ ११:०२:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: