मराठी भाषेच्या विकासासाठी कर्तृत्व वाढवणे आवश्यक - डॉ. सदानंद मोरे
पिंपरी : पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनच्या २६ व्या स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवात "मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पुढे काय?" या विषयावर आयोजित परिसंवादात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी महत्त्वपूर्ण विचार मांडले.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पुढील वाटचालीबद्दल बोलताना डॉ. मोरे म्हणाले की, मराठी माणसाचे कर्तृत्व वाढल्याशिवाय भाषा मोठी होऊ शकणार नाही. त्यांनी मराठी भाषिकांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन केले.
लक्ष्मीकांत देशमुख यांनी अनुवाद अकादमीची स्थापना, अन्य राज्यांमध्ये मराठी अध्ययन केंद्रे सुरू करण्याची गरज व्यक्त केली. रामदास फुटाणे यांनी मराठी भाषेच्या टिकवण्यात कला, साहित्य, संगीत आणि चित्रपट या माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.
संजय सोनवणी यांनी महाराष्ट्रातील १८,००० मराठी माध्यमाच्या शाळा बंद झाल्याची खंत व्यक्त केली आणि मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रवीण तुपे यांनी स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवाच्या २६ वर्षांचा आढावा घेतला. बाबासाहेब काळे यांनी स्वागत केले तर राजन लाखे यांनी आभार मानले.
Reviewed by ANN news network
on
११/०६/२०२४ ०१:२५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: