मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी मार्गावर २० विशेष फेऱ्या
पुणे : मध्य रेल्वे प्रशासनाने कार्तिकी मेळाव्यानिमित्त मिरज-पंढरपूर आणि मिरज-कुर्डूवाडी दरम्यान विशेष अनारक्षित रेल्वे सेवा जाहीर केली आहे. ही सेवा १० ते १४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत चालवली जाणार आहे.
मिरज-पंढरपूर मार्गावर गाडी क्रमांक ०१४४९ ही मिरजहून सकाळी ५.०० वाजता सुटून पंढरपूरला ७.४० वाजता पोहोचेल. तर परतीची गाडी क्रमांक ०१४५० पंढरपूरहून सकाळी ९.५० वाजता निघून दुपारी १.५० वाजता मिरजला पोहोचेल.
मिरज-कुर्डूवाडी मार्गावर गाडी क्रमांक ०१४४७ ही मिरजहून दुपारी ३.१० वाजता सुटून संध्याकाळी ७.०० वाजता कुर्डूवाडीला पोहोचेल. तर परतीची गाडी क्रमांक ०१४४८ कुर्डूवाडीहून रात्री ९.२५ वाजता निघून पहाटे १.०० वाजता मिरजला पोहोचेल.
प्रत्येक गाडीत १० सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन असे एकूण १२ डबे असतील. विस्तृत वेळापत्रकासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा NTES ॲप वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Reviewed by ANN news network
on
११/०६/२०२४ ०१:४९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: