पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील उत्तर भारतीय बांधवांच्या छठ पूजा उत्सवासाठी सर्व आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्याची मागणी छठ पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना दिलेल्या निवेदनात गुप्ता यांनी घाट परिसरात स्वच्छता, निर्माल्य व्यवस्था, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, अग्निशामक सेवा आणि सजावटीची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे.
७ नोव्हेंबरला बडकी छठ आणि ८ नोव्हेंबरला पारण हे दोन महत्त्वाचे दिवस असून, या काळात पवना नदी घाटावर गंगा आरती, पूजा, भजन आणि छठ लोकगीतांचे कार्यक्रम होणार आहेत.
हनुमान मित्र मंडळाच्या वतीने चिंचवडगावातील पवना नदी घाटावर दरवर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. जितेंद्र गुप्ता, शशिकांत श्रीवास्तव, देवानंद गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवर या आयोजनात सहभागी होतात.
पूर्वीच्या वर्षांप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविक या उत्सवात सहभागी होणार असल्याने सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचे आवाहन समितीने केले आहे.
Reviewed by ANN news network
on
११/०६/२०२४ ०२:१७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: