उरण विधानसभा निवडणूक २०२४: तिरंगी लढतीत महिला मतदार ठरणार गेमचेंजर

 


उरण (विठ्ठल ममताबादे ) - उरण विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि भाजप यांच्यात त्रिरंगी लढत रंगणार असून, पुरुषांच्या बरोबरीने असलेल्या महिला मतदारांची मते निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मतदारसंघातील एकूण ३ लाख ४२ हजार १०१ मतदारांपैकी १ लाख ७१ हजार ५२६ पुरुष आणि १ लाख ७० हजार ५६३ महिला मतदार आहेत. २०१९ च्या तुलनेत यंदा ७० हजारांहून अधिक नवीन मतदारांची भर पडली आहे.

२०१९ च्या निवडणुकीत सध्याचे भाजप आमदार महेश बालदी यांना ७४,५४९, शिवसेनेचे मनोहर भोईर यांना ६८,८३९ तर शेकापचे विवेक पाटील यांना ६१,६०६ मते मिळाली होती. यंदा भाजपकडून महेश बालदी, शिवसेना ठाकरे गटाकडून मनोहर भोईर तर शेकापकडून प्रीतम म्हात्रे रिंगणात आहेत.

मतदारसंघातील ३५५ मतदान केंद्रांवर १,८९३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी एकूण १४ उमेदवार मैदानात असून, त्यात प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश आणि शिवसेनेतील फूट यामुळे यंदाची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. विशेषतः महिला मतदारांची संख्या लक्षात घेता, त्यांची मते कोणत्या पक्षाकडे झुकतात यावर निकाल अवलंबून राहणार आहे.


उरण विधानसभा मतदार संघात उभे असलेले उमेदवार :- 

१९० - उरण विधानसभा मतदार संघामध्ये एकूण १६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ०२ उमेदवारांनी माघार घेतली असून आता १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे. - १) मनोहर गजानन भोईर (शिवसेना, उबाठा, चिन्ह मशाल), २) महेश रतनलाल बालदी (भारतीय जनता पार्टी, चिन्ह कमळ), ३) ॲड.सत्यवान पंढरीनाथ भगत (महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चिन्ह रेल्वे इंजिन), ४) सुनील मारुती गायकवाड (बहुजन समाज पार्टी, चिन्ह हत्ती), ५)कृष्णा पांडुरंग वाघमारे (ऑल इं‍डिया फॉरवर्ड ब्लॉक, चिन्ह सिंह), ६)प्रीतम जे.एम. म्हात्रे (पिझंटस अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया, चिन्ह शिट्टी), ७) महेश गणपत कोळी (लोकराज्य पार्टी, चिन्ह जहाज), ८) कुंदन प्रभाकर घरत (अपक्ष, चिन्ह बॅट), ९)  निलम मधुकर कडू (अपक्ष, चिन्ह ट्रम्पेट), १०) प्रीतम धनाजी म्हात्रे (अपक्ष, एअर कंडिशनर), ११) प्रीतम बळीराम म्हात्रे (अपक्ष, चिन्ह कपाट), १२) बाळकृष्ण धनाजी घरत (अपक्ष, चिन्ह किटली),
१३) मनोहर भोईर (अपक्ष, चिन्ह नरसाळे), १४) श्रीकन्या तेजस डाकी  (अपक्ष, चिन्ह गॅस सिलेंडर).
उरण विधानसभा निवडणूक २०२४: तिरंगी लढतीत महिला मतदार ठरणार गेमचेंजर उरण विधानसभा निवडणूक २०२४: तिरंगी लढतीत महिला मतदार ठरणार गेमचेंजर Reviewed by ANN news network on ११/०५/२०२४ ०८:०३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".