भापकरांच्या कार्यअहवालाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चिंचवड, : महाशक्ती आघाडी आणि महाराष्ट्र स्वराज यांचे २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार मारुती साहेबराव भापकर यांनी रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी आणि चिंचवडगाव येथे चौक सभांची मालिका घेतली.
"ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे, प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांची आहे," असे स्पष्ट मत भापकर यांनी व्यक्त केले. "माझे विधिमंडळातील प्रयोजन मतदारांच्या तिजोरीचे रक्षण करणे हे आहे, तर इतर उमेदवारांना करदाते नागरिकांच्या तिजोरीवर डल्ला मारायचा आहे," असा थेट आरोप त्यांनी केला.
भापकर यांनी मतदारांना एक अभूतपूर्व अधिकार दिला आहे. त्यांनी जाहीर केले की, "मी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यास, मतदारांना माझ्या आमदारकीचा राजीनामा मागण्याचा अधिकार मी स्वेच्छेने देत आहे."
सभेदरम्यान त्यांनी आपला कार्यअहवाल आणि गॅरंटीपत्र मतदारांमध्ये वितरित केले. "हा अहवाल आणि गॅरंटीपत्र वाचून, आपल्याला पटले तरच मला मत द्यावे, अन्यथा आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करावे," असे आवाहन त्यांनी केले.
परिसरातील मतदारांनी भापकर यांच्या या पारदर्शक दृष्टिकोनाचे आणि गॅरंटीपत्राचे स्वागत केले. विशेषतः रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी आणि चिंचवडगाव येथील नागरिकांनी त्यांच्या या पुढाकाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०३:३१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: