कृष्णमूर्ती पद्धत आणि वास्तूशास्त्रावर दोन दिवसीय विचारमंथन
पुणे : गौरीकैलास ज्योतिष संस्थेच्या वतीने आयोजित वास्तू ज्योतिष संमेलनाचे उद्घाटन आज सकाळी १० वाजता प्रसिद्ध वास्तू तज्ज्ञ डॉ. आनंद भारद्वाज (दिल्ली) यांच्या हस्ते झाले. डॉ. त्रिशला शेठ यांनी अध्यक्षस्थान भूषवले.
हॉटेल प्रेसिडेंट, प्रभात रस्ता येथे १५ आणि १६ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या संमेलनात भालचंद्र ज्योतिर्विद्यालय, स्मार्ट ऍस्ट्रॉलॉजर्स, ज्योतिष प्रबोधिनी यांसह अनेक नामवंत संस्था सहभागी झाल्या आहेत.
उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. भारद्वाज यांनी भारतीय ज्ञानसंस्कृतीचे महत्त्व विशद करत ते जगभर पोहोचवण्याचे आवाहन केले. डॉ. त्रिशला शेठ यांनी अशा संमेलनांमधून होणाऱ्या ज्ञानदेवाणघेवाणीचे महत्त्व अधोरेखित केले.
पहिल्या दिवशी डॉ. कीर्ती शाह, श्री नाटेकर, राहुल सरोदे यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. उद्या होणाऱ्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात श्री. सिल गुरु यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, दत्तप्रसाद चव्हाण अध्यक्षस्थानी असतील.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विविध ज्योतिषविषयक सत्रे, प्रश्नोत्तरे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, कै. मनोहर केंजळे स्मृती पुरस्काराने डॉ. जयश्री बेलसरे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
गौरीकैलास ज्योतिष संस्थेचे संस्थापक कैलास केंजळे आणि सौ. गौरी केंजळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गणेशशास्त्री शुक्ल आणि अपर्णा पैठणकर यांनी सूत्रसंचालन केले.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०३:३५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: