चिंचवड - स्वराज पक्षाचे उमेदवार भापकर मारुती साहेबराव यांनी चिंचवड परिसरात आपल्या कामाचा अहवाल आणि गॅरेंटी पत्र वाटप करून एक वेगळी राजकीय शैली अवलंबली आहे.
सोमवारी चिंचवडगाव येथील गावाचे आराध्य दैवत श्री मोरया गोसावी मंदिरात जाऊन श्रींच्या चरणी कार्यअहवाल आणि गॅरेंटी पत्र वाहून चिंचवडगावातील आपल्या प्रचाराची सुरुवात केली. चिंचवडगाव, चिंचवडे नगर, वाल्हेकर वाडी, केशवनगर, दळवीनगर, वेताळनगर आणि बिजलीनगर या परिसरांमध्ये भापकर यांनी घरोघरी जाऊन आपला कार्यअहवाल आणि गॅरेंटीपत्र वाटप केले. या अभिनव उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करताना पारदर्शक कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले. भापकर यांनी दिलेल्या गॅरेंटी पत्रामध्ये त्यांच्या भविष्यातील योजना आणि आश्वासनांचा समावेश करण्यात आला आहे.
"आमच्या कार्याचा हिशेब नागरिकांना देणे हे आमचे कर्तव्य आहे," असे भापकर यांनी या वेळी सांगितले. त्यांच्या या पारदर्शक कार्यपद्धतीचे अनेक नागरिकांनी कौतुक केले.
Reviewed by ANN news network
on
११/१२/२०२४ १०:०९:०० AM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: