वाकड (प्रतिनिधी) - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या निवडणूक प्रचाराचा औपचारिक शुभारंभ बुधवारी (ता. ६) सायंकाळी ५ वाजता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
वाकड गावठाणातील ग्रामदैवत म्हातोबा मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली जाणार असून, त्यानंतर भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
पदयात्रा वाकड गावठाण ते वाकड चौक, उत्कर्ष चौक, माऊली चौक, अण्णाभाऊ साठे चौक, सम्राट चौक, वेणूनगर, पिंक सिटी रोड, छत्रपती चौक, अंबियन्स हॉटेल-मानकर चौक मार्गे वाकड चौकापर्यंत जाणार आहे.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
Reviewed by ANN news network
on
११/०५/२०२४ ०८:२३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: