विविध पक्षांच्या नेत्यांचा राहुल कलाटे यांच्या पदयात्रेत सहभाग
पिंपरी-चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे उमेदवार राहुल कलाटे यांच्या पिंपळे निलख-विशालनगर परिसरातील पदयात्रेला मोठा जनसमुदाय लाभला. आम आदमी पार्टीचे रविराज काळे यांनी कलाटे यांना पाठिंबा जाहीर करत विजयी मताधिक्य मिळवून देण्याचा विश्वास व्यक्त केला.
पिंपळे निलख येथील पक्ष कार्यालयासमोर रविराज काळे यांनी कलाटे यांचे विशेष स्वागत केले. या वेळी बोलताना काळे म्हणाले की, चिंचवड विधानसभेत नक्कीच परिवर्तन घडून येईल.
पदयात्रेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सचिव पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०३:१८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: