आदिवासी समाजाच्या सशक्तीकरणासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही
चिंचवड : महायुतीचे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शंकर जगताप यांनी आज क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. पिंपळे गुरव येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना जगताप यांनी बिरसा मुंडा यांच्या शौर्य, त्याग आणि कार्याची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
"बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरुद्ध आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी दिलेला लढा देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा देणारा ठरला," असे जगताप म्हणाले. त्यांनी आदिवासी समाजाच्या सशक्तीकरणासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाला माजी नगरसेविका उषा मुंढे, आशा सुपे यांच्यासह सह्याद्री आदिवासी महिला विकास प्रतिष्ठान आणि आदिवासी तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"बिरसा मुंडा यांचे अदम्य साहस हे आमचे प्रेरणास्रोत आहे. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आम्ही आदिवासी समुदायाच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत राहू," असे जगताप यांनी या प्रसंगी सांगितले.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०३:१५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: