पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची प्रचार मोहीम जोरदार
पिंपरी : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी महाराष्ट्राच्या विकास आणि प्रगतीसाठी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
तुळजाभवानी मंदिर, पोटे कॉर्नर (संभाजीनगर) येथून सुरू झालेल्या प्रचार फेरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सुबोध विद्यालय, अटल बिहारी वाजपेयी उद्यान, शाहूनगर, धम्मचक्र बुद्ध विहार, कस्तुरी मार्केट आणि आंबेडकर कॉलनी या मार्गावर प्रचार फेरी निघाली.
विशेष म्हणजे अनेक ठिकाणी महिला भगिनींनी आमदार बनसोडे यांचे औक्षण करून विजयाच्या शुभेच्छा दिल्या. बाल दिनानिमित्त बनसोडे यांनी बालगोपाळांना शुभेच्छा दिल्या तर अनेक पालकांनी आपल्या मुलांसोबत त्यांचे छायाचित्र काढले.
या प्रचार फेरीत आमदार अमित गोरखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, माजी महापौर मंगला कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०३:२१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: