रहाटणीत शंकर जगताप यांच्या प्रचाराला जनसागराचा प्रतिसाद


 "स्व. लक्ष्मणभाऊंच्या विकासकार्याची पावती देणार" - रहाटणीकर

चिंचवड (प्रतिनिधी): चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या समर्थनार्थ रहाटणीतील ग्रामस्थांनी एकजूट दाखवली आहे. स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि आमदार अश्विनीताई जगताप यांनी केलेल्या विकासकामांची पावती म्हणून विक्रमी मताधिक्याने जगताप यांना विजयी करण्याचा संकल्प रहाटणीकरांनी व्यक्त केला.

गुरुवारी (दि.१४) रहाटणी गावात निघालेल्या भव्य पदयात्रेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. श्री काळभैरवनाथ मंदिरात पूजा करून सुरू झालेल्या या पदयात्रेत मावळचे खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष सनी मानकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते सहभागी झाले.

रामनगर, गोडांबे चौक, नखाते वस्ती, बसवेश्वर चौक, रहाटणी फाटा, शास्त्रीनगर अशा विविध भागांत फिरताना नागरिकांनी पुष्पवृष्टी करून जगताप यांचे स्वागत केले. विशेषतः महिला वर्गाने 'लाडकी बहीण योजने'बद्दल कृतज्ञता व्यक्त करत जगताप यांना पाठिंबा दिला.

"स्व. लक्ष्मणभाऊ आणि अश्विनीताई यांच्या आमदार निधीतून रहाटणीचा कायापालट झाला. सौर दिवे, दगडी पार, ज्येष्ठ नागरिकांसाठी चावडी, पेव्हिंग ब्लॉक, ड्रेनेज लाईन अशी अनेक विकासकामे झाली आहेत," असे जगताप यांनी सांगितले.

रहाटणीत शंकर जगताप यांच्या प्रचाराला जनसागराचा प्रतिसाद रहाटणीत शंकर जगताप यांच्या प्रचाराला जनसागराचा प्रतिसाद Reviewed by ANN news network on ११/१४/२०२४ ०९:०४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".