"मूलभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योजक नाराज"
भोसरी (प्रतिनिधी): भोसरी मतदारसंघातील तळवडे, चिखली, मोशी परिसरातील पाच हजाराहून अधिक लघुउद्योजकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या दहा वर्षांत मूलभूत सुविधांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे उद्योजकांमध्ये नाराजी आहे.
कासारवाडी येथील कलासागर हॉटेलमध्ये झालेल्या इंडस्ट्रियल ग्रुपच्या बैठकीत उद्योजकांनी खंडित वीजपुरवठा, अपुरे रस्ते आणि वाहतूक कोंडीच्या समस्या मांडल्या. या समस्यांमुळे उत्पादनावर परिणाम होत असून कामगारांना बसून पगार द्यावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवार यांचे कारखानदारीला पोषक धोरण आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीच्या विकासातील त्यांची भूमिका लक्षात घेता महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे उद्योजकांनी स्पष्ट केले.
अजित गव्हाणे यांनी शहरातील रोजगार निर्मितीवर भर देत, मोशी, चिखली, तळवडे, भोसरी एमआयडीसी येथील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले.
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२४ ०९:०४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: