"चिंचवडमध्ये भोईरांच्या पदयात्रेला स्वयंस्फूर्त प्रतिसाद"
चिंचवड (प्रतिनिधी): चिंचवड विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांच्या प्रचार मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेवटच्या दोन दिवसांत मतदारसंघाचे गणित बदलून भोईर आघाडीवर राहतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
उद्योगनगर, दळवीनगर, भोईरनगर, इंदिरानगर, प्रेमलोक पार्क परिसरात झालेल्या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. या भागात भोईर यांनी गेली 25 वर्षे नगरसेवक म्हणून केलेल्या कामाचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवडला सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख मिळवून देण्यात भोईर यांचे योगदान महत्त्वाचे असून, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे ते अध्यक्ष आहेत.
'कपाट' या चिन्हावर निवडणूक लढवत असलेले भोईर यांनी साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रातील आपल्या कार्याचा उल्लेख करत, चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याचा विश्वास व्यक्त केला.
शेवटच्या दोन दिवसांत चिंचवडचे गणित बदलणार - भाऊसाहेब भोईर
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२४ ०९:००:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२४ ०९:००:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: