चिंचवड (प्रतिनिधी): चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. भोंडवे यांनी जगतापांना एक लाखांच्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
रावेतमधील जनतेचा कौल घेऊन हा निर्णय घेतल्याचे सांगत भोंडवे म्हणाले की, चिंचवड विधानसभेच्या विकासासाठी शंकर जगताप हेच सक्षम पर्याय आहेत. या पाठिंब्यामुळे जगतापांची ताकद द्विगुणित झाली असून, विक्रमी मताधिक्याने विजय मिळवण्याचा विश्वास वाढला आहे.
शंकर जगताप यांनी भोंडवे यांच्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करत रावेतच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे नमूद केले. आगामी काळात दोघेही खांद्याला खांदा लावून चिंचवड मतदारसंघाच्या विकासासाठी काम करणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
या राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडीच्या आशा धूसर झाल्या असून, चिंचवड मतदारसंघात महायुतीच्या विजयाची चिन्हे स्पष्ट होत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: