मुंबई (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टीचे संकल्पपत्र हे 2029 पर्यंत राज्याच्या सर्वांगीण विकासाची हमी देणारे असून, महायुती सरकार कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांच्या विकासासाठी कार्यरत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले.
भाजपा मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. गोयल यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या साथीने महायुती सरकार तिप्पट वेगाने प्रगती करत असून त्याचा अनुभव जनता घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला नवी ऊर्जा आणि विकासाचे नवे पंख मिळाले आहेत.
महाविकास आघाडीवर टीका करताना श्री. गोयल म्हणाले की, दिलेली आश्वासने न पाळणाऱ्या आघाडीवर जनतेचा विश्वास उडाला असून, आगामी निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना मूठमाती दिल्याचीही टीका त्यांनी केली.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. सय्यद जफर इस्लाम, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/११/२०२४ ०७:५९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: