चिंचवड - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराला उद्या मोठी झळाळी येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ स्वतः पक्षप्रमुख शरद पवार उद्या (ता. १४) वाल्हेकरवाडीतील आहेर गार्डन येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
दुपारी बारा वाजता होणाऱ्या या सभेसाठी हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या बाईक रॅलीतून उपस्थित राहणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता सांगवीतील साई चौकापासून भव्य रॅलीला सुरुवात होणार आहे.
निवडणुकीला अवघे सहा दिवस उरले असताना, धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची ही लढाई रंगतदार टप्प्यात प्रवेशली आहे. सोशल मीडियावर शरद पवारांच्या स्वागतपर पोस्टचा पाऊस पडत असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
"पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीच्या विकासात आणि हिंजवडी आयटी पार्कच्या निर्मितीत शरद पवार यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे," असे आवाहन राहुल कलाटे यांनी केले आहे.
मतदारसंघात "वारं फिरलंय, निवडणूक आता लोकांनी हातात घेतली आहे" अशी चर्चा रंगत असून, शरद पवार नेमका कोणता निर्णायक डाव टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Reviewed by ANN news network
on
११/१३/२०२४ ०८:०३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: