पुणे (प्रतिनिधी): राज्य उत्पादन शुल्क विभागाने दौंड आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघात केलेल्या कारवाईत १७ लाख ७१ हजार ८०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ९ ते ११ नोव्हेंबर दरम्यान ही कारवाई करण्यात आली. दौंड मतदारसंघात हातभट्टी दारूसह दोन चारचाकी वाहने जप्त करून दोघांना अटक करण्यात आली.
इंदापूर मतदारसंघातील वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवा राज्यात निर्मित व तेथेच विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एका चारचाकी वाहनासह दोघांना अटक करण्यात आली.
या कारवाईत दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, मयूर गाडे, मनोज होलम आणि सागर साबळे सहभागी होते, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली.
Reviewed by ANN news network
on
११/१३/२०२४ ०६:२४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: