"देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी करणाऱ्यांना जनता देणार चपराक" - जे.पी. नड्डा
मुंबई - "राजकीय स्वार्थासाठी देशविरोधी आणि विभाजनवादी शक्तींना पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना मतदारांनी निवडणुकीत धडा शिकवावा," असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बुधवारी केले.
मलबार हिल मतदारसंघात व्यावसायिकांशी संवाद साधताना नड्डा बोलत होते. या वेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
"बाळासाहेब ठाकरेंची प्रखर राष्ट्रवादी विचारसरणी बाजूला ठेवून उद्धव ठाकरे यांनी केवळ सत्तेसाठी काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे," असा थेट आरोप नड्डा यांनी केला. कर्नाटकमधील काँग्रेस खासदाराच्या विभाजनवादी वक्तव्यांचा आणि जेएनयूमधील देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना काँग्रेसने दिलेल्या उमेदवारीचा त्यांनी समाचार घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत देशाची राजकीय संस्कृती बदलल्याचे सांगताना नड्डा म्हणाले, "पूर्वीच्या घराणेशाही आणि भ्रष्टाचाराऐवजी आता 'सबका साथ, सबका विकास' ही नवी राजकीय संस्कृती रुजली आहे."
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा गौरवपूर्ण उल्लेख करत नड्डा यांनी महाराष्ट्राच्या क्रांतिकारी आणि समाजसुधारकांच्या परंपरेचाही गौरव केला.
Reviewed by ANN news network
on
११/१३/२०२४ ०८:०६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: