चिंचवड - चिंचवड विधानसभा मतदारसंघात आज दुपारी १ वाजेपर्यंत २९.३४ टक्के मतदान झाले असून, एकूण १,९४,७२४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
प्राप्त आकडेवारीनुसार, दुपारपर्यंत १,०९,१६८ पुरुष आणि ८५,५५४ महिला मतदारांनी मतदान केले. तसेच २ इतर मतदारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी सकाळी महात्मा ज्योतिबा फुले शाळा, दळवीनगर येथे मतदान केले. यावेळी त्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. "प्रत्येक मतदाराने आपला हक्क बजावणे गरजेचे आहे. आपण मतदार राजे आहोत," असे भोईर यांनी सांगितले.
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार मारुती भापकर यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांनी कुटुंबासह मतदान केले. भोसरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी सकाळी लवकरच मतदान केले, तर पर्वती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनीही मतदान केले.
मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, सर्वत्र मतदान सुरू आहे.
---
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी निवडणुकीचा हक्क बजावला.
------
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी २१० कोथरूड विधानसभा मतदार संघांतर्गत सक्सेस टॉवर, पंचवटी, पाषाण येथील मतदान केंद्र क्र. १२२ येथे मतदानाचा हक्क बजावला; तसेच अधिकारी, कर्मचारी आणि मतदारांशी संवाद साधला.
----------
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्री शेखर सिंह यांनी आज एस एस अजमेरा स्कूल मासुळकरर कॅालनी पिंपरी येथे सपत्नीक मतदान केले.
-------------------------
Reviewed by ANN news network
on
११/२०/२०२४ ०२:२५:०० PM
Rating:




कोणत्याही टिप्पण्या नाहीत: