चाळीसगाव (प्रतिनिधी): "कोविड महामारीच्या काळात देशभरातील मुख्यमंत्री संकटाशी लढत असताना, घरात बसणारे उद्धव ठाकरे हे एकमेव मुख्यमंत्री होते," अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थेट टीका केली.
चाळीसगाव येथील सभेत बोलताना शाह म्हणाले, "एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे महायुती सरकारच महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास समर्थ आहे." हरियाणा निवडणुकीचा दाखला देत 23 तारखेला महाराष्ट्रातही आघाडीचा पराभव होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेताना शाह म्हणाले, "2004-14 मध्ये काँग्रेसने महाराष्ट्राला 1.91 लाख कोटी दिले, तर मोदी सरकारने 10.15 लाख कोटी रुपये दिले." पाकिस्तानातील दहशतवादी कारवायांपासून ते चंद्रयानाच्या यशापर्यंत विविध मुद्द्यांवर त्यांनी सरकारची कामगिरी विशद केली.
"महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत आल्यास महाराष्ट्र हे दिल्ली काँग्रेसचे एटीएम बनेल," असा इशारा देत महायुती सरकारच्या विविध योजनांचाही त्यांनी उल्लेख केला.
Reviewed by ANN news network
on
११/१३/२०२४ ०६:०७:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: